Category: Uncategorized
अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!
शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८ मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी…
तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस गटात विकासाचे ‘दिपाली’ व्हिजन; दिपाली गव्हाणे यांच्या संकल्पनाम्याने शिरूरकरांना घातली भुरळ
तळेगाव ढमढेरे ( ता. शिरूर) : शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या सेवेचे एक नवीन विकासाचे मॉडेल उमलताना दिसत असून तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात एका नव्या पर्वाची नांदी होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे यांनी मांडलेल्या प्रगल्भ ‘संकल्पनाम्या’ने सध्या संपूर्ण शिरूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून…
बकोरी परिसरात भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार व संवादास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बकोरी (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लोणीकंद–बकोरी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार पै. किरण संपतराव साकोरे, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी…
पै.किरण साकोरेंच्या माध्यमातून वढू खुर्द येथील कुबेर पार्कच्या रस्त्याचे मुरुमीकरण
पुणे–नगर महामार्गालगत वेगाने विस्तारत असलेल्या पेरणे फाटा–वढू खुर्द परिसरातील कुबेर पार्क येथील रहिवाशांचा अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या पुढाकारातून या अंतर्गत रस्त्याचे स्वखर्चाने मुरुमीकरण पूर्ण झाल्याने सुमारे ५०० हून अधिक नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे. कुबेर पार्क परिसरात मोठी लोकवस्ती असून, या वस्तीला…
धक्कादायक! लोणी काळभोर येथे कार अंगावरून गेल्याने पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू
चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले ! लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ…
अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव
कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…
सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…
कोरेगाव भीमात ‘ग’ फॅक्टरचा धमाका; ‘राजकीय जादुगारा’चा डाव उलटवला, गव्हाणे भावकीची वज्रमूठ!
अटीतटीच्या लढतीत अनिकेत गव्हाणे विजयी; ‘भरत’ बाणाने भेदले सत्तेचे लक्ष्य, ‘बबड्या’ ठरला गावचा कारभारी कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर तालुक्याचे राजकीय प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीने तालुक्याच्या राजकारणाची सर्व गणितेच बदलून टाकली आहेत. राजकारणातील ‘जादुगार’ समजल्या जाणाऱ्या किंगमेकरचे सर्व डावपेच धुळीस मिळवत, अनिकेत साहेबराव गव्हाणे यांनी ९ विरुद्ध ६ मतांनी सरपंचपदाची माळ…
माणुसकीचा सेवा कर्तव्य’ पथ: शिक्रापूरमध्ये ७५०० भीम अनुयायांना अल्पोपहार व सेवा
कर्तव्य फाउंडेशनचा उपक्रम; २०८ व्या शौर्यदिनानिमित्त सामाजिक दातृत्वाचे दर्शन शिक्रापूर (ता.शिरूर): कोरेगाव भीमा जवळील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भीम अनुयायांच्या सेवेसाठी शिक्रापूर येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने माणुसकीचा हात पुढे करण्यात आला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी फाउंडेशनच्या वतीने सुमारे साडेसात हजार अनुयायांना व्हेज पुलाव, चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. नववर्षाच्या…
१ जानेवारी २०२६ रोजी शौर्यदिनी विजय स्तंभावर संविधानाचा जागर
कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार पेरणेफाटा (ता. हवेली) : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या १ जानेवारी २०२६ रोजी शौर्यदिनी कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयरणस्तंभावर संविधान मूल्यांचा जागर करणारी विशेष सजावट…
