Category: Uncategorized
पुण्यात नवऱ्याने हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला लाटण्याने बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव
पत्नीने घेतला करंगळीचा चावा, लाटण्याने मारहाण, मिक्सरचे भांड्यानेही मारहाण करत नखाने ओरबाडले पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.यामुळे भयभीत झालेल्या…
बेघर वृद्धाला दिला मायेचा आधार: सरपंच रमेश गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपचे माणुसकीचे दर्शन
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर…
धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणाची निघून हत्या.. कोयत्याच्या वर्मी घावाने कवटी फुटली, डाव्या हाताचे मनगट तुटले
अंबप (ता. हातकणंगले)येथील पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) याच्यावर धारदार कोयत्याने आठ सपासप वार केले यामध्ये डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली तसेच डाव्या हाताचे मनगट तुटले यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.( In front of the water tank…
व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड
रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….
श्री क्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच गिलबिले यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी १२ तासांत ठोकल्या बेड्या
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.१) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पप्पु नामदेव गिलबिलेला अटक करण्यात आले असून शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या…
मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था
पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले. पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…
दौंडमध्ये एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला तर दुसऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड,…
धक्कादायक ! शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा धारदार शस्त्राने केला खून
मानेवर वर्मी घाव, घटना स्थळी व परिसरात शिक्रापूर पोलिसांचा बंदोबस्त शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अंदाजे ३५ वर्षीय इसमाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे.(A shocking incident has taken place in which a 35-year-old…
सावधान ! अनोळखी नंबरवरून आलेली APK लग्नपत्रिका डाऊनलोड कराल तर तुमचे बँक खाते होईल रिकामे
पुणे – व्हॉट्सॲपवर कोणत्या अनोळख्या मोबाइल नंबरवरून जर कोणती लग्नपत्रिका आली तर ती डाऊनलोड करू नका, अन्यथा मोबाइल हॅक झालाच म्हणून समजा.सध्या लग्नाचा हंगाम आहे. अनेक जण WhatsApp आणि ईमेलवर लग्नपत्रिका पाठवतात. त्यातील काही जण आपल्याला ओळखीचेही नसतात. त्यांचा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेला नसतो. तरीही कोणीतरी ओळखीचा किंवा मित्र असेल असे वाटून आपण…
