Category: Uncategorized
दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये
दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…
श्री शंभूछत्रपतींच्या समाधीस्थळावर रक्ताभिषेक रक्तदान महायज्ञामध्ये ५५८९ शंभूभक्तांनी केले रक्तदान
कोरेगाव भीमा दि. २ मार्च वढू बुद्रुक (ता.शिरूर) भारताला गौरवास्पद व अभिमान वाटेल असे जागतिक दर्जाचे शंभू छत्रपतींचे स्मारक वढू – तुळापुर येथे साकारत असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये पाच हजारापेक्षा जास्त शंभू भक्तांनी रक्तदान करून शंभू छत्रपतींच्या समाधीवर खऱ्या अर्थाने रक्ताभिषेक करण्यात आला असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी…
पुण्यात दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर व फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल पोलिसांचा गोळीबार
पुणे – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली…
बीजेएस महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान सप्ताह उत्साहात संपन्न
शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी वाघोली (ता. हवेली) – भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान बीजेएस सायन्स फेस्टअंतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन, शास्त्रीय प्रकल्प स्पर्धा, प्रश्नमंजुषा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव चिकाटे यांनी “विज्ञान आणि संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
धक्कादायक ! शिरूर तालुक्यात कारेगाव येथे १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
मामेभावासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पडले भाग, त्याचा व्हिडिओ बनवत केला आळीपाळीने अत्याचार, युवतीचे सोन्याचे दागिने घेतले काढून शिरूर : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरण ताजे असताना शिरूर तालुक्यात दरोड्यासह सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सामूहिक बलात्काराची घटना…
दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात
लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…
गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार – महसूलमंत्री बावनकुळे
राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर…
पुण्यात महसूल सहाय्यक महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेताना अटक
इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन…
बी जे एस महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
२५ फेब्रुवारी २०२५ वाघोली (ता.हवेली)भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी ३३स्वयंसेवकांनी रक्तदान करत सामाजिक उत्तरदायित्व व बांधिलकी जपली. या शिबिरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय, औंध यांच्या ब्लड…
धक्कादायक ! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर बलात्कार
दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने…
