Category: Uncategorized
‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!
सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…
Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.
वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटले
दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…
५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…
नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त
पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…
संतापजनक! रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी लावलं ॲसिड; महिला गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटाला सोनोग्राफी करण्यापूर्वी जेलीऐवजी ॲसिड(किंवा तत्सम दाहक रसायन) लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे. नेमकी काय घडली घटना? खापरखेडा वाडी…
राज्यातील वीज ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’; पहिल्यांदाच पाच वर्षांत दर कमी होणार!
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या वर्षी वीज दरात १०…
आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजयव गांगुर्डे सेवेतून बडतर्फ; २७.५१ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात कोट्यावधी रुपयांच्या धान्य खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर २७.५१ कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हे आदेश दिले आहेत, ज्यामुळे…
धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास…
दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन
शिरूर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…
