तळेगाव ढमढेरे ( ता. शिरूर) : शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या सेवेचे एक नवीन विकासाचे मॉडेल उमलताना दिसत असून तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात एका नव्या पर्वाची नांदी होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे यांनी मांडलेल्या प्रगल्भ ‘संकल्पनाम्या’ने सध्या संपूर्ण शिरूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ आश्वासनांची खैरात न करता, ग्रामीण जीवनाचा कायापालट करणारा ‘आराखडा’ त्यांनी मतदारांसमोर ठेवल्याने जनमानसावर दिपाली राहुल गव्हाणे यांच्या कार्याची खोल छाप पडत आहे.
तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे, तळेगाव ढमढेरे पांचट समिती गणाच्या उमेदवार विद्याताई राजेंद्र भुजबळ व रांजणगाव सांडस पंचायत समिती गण हनुमंत बापू काळे यांच्या समन्वयाने सदर संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला
नव्या युगाचे ‘व्हिजनरी’ नेतृत्व : नव्या युगाच्या गतिशील व कृतिशील राजकारणाची मुहूर्तमेढ रोवत दिपाली गव्हाणे यांनी ‘रिझल्ट ओरिएंटेड’ कामाची पद्धत अवलंबली आहे. समाजकारणाची जोड देत त्यांनी मांडलेली ‘विकासनीती‘ ही आरोग्य, आधुनिक शेती आणि डिजिटल शिक्षणाच्या त्रिवेणी संगमावर आधारित आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे ग्रामीण राजकारणात प्रथमच वैचारिक आणि विकासाभिमुख चर्चा होताना दिसत आहे.
आरोग्य आणि शेती: संकल्पनाम्यातील केंद्रबिंदू – ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बऱ्याचदा सुविधांच्या अभावामुळे कमकुवत असते. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी तळेगाव येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प गव्हाणे यांनी केला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा आणि महिला-बालकांसाठी ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना आरोग्यसेवेला थेट दारापर्यंत पोहोचवणारी ठरणार आहे.
शेतीच्या बाबतीत त्यांनी मांडलेली ‘दलालमुक्त बाजारपेठ’ ही संकल्पना बळीराजासाठी वरदान ठरू शकते. शेतकरी गट आणि शहरातील सोसायट्यांमध्ये थेट दुवा निर्माण करून, भाजीपाला प्रक्रिया केंद्रे व शीतगृह प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला नफ्याचा व्यवसाय बनवण्याचे ध्येय यात प्रतिबिंबित झाले आहे.
डिजिटल शिक्षण आणि युवा सक्षमीकरण : शिक्षण क्षेत्रात ‘वाबळेवाडी पॅटर्न’चा यशस्वी प्रयोग या गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवून त्या डिजिटल करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. केवळ पदवीधर नव्हे, तर ‘कौशल्यपूर्ण तरुण’ घडवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण केंद्रे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची उभारणी करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.
पारदर्शक प्रशासन: जिल्हा परिषद कामकाजात पूर्ण पारदर्शकता आणि ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा.
पर्यावरण: वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर १ लाख वृक्षारोपणाचा निर्धार आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन.
महिला सक्षमीकरण: बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देऊन महिलांना आर्थिक केंद्रस्थानी आणणे.
क्रीडा व संस्कृती: ग्रामीण प्रतिभांना व्यासपीठ देण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणे आणि सांस्कृतिक मंचाची उभारणी.
विकासाचा त्रिवेणी संगम : दिपाली राहुल गव्हाणे यांच्यासोबतच पंचायत समिती उमेदवार विद्या राजेंद्र भुजबळ आणि हनुमंत बापू काळे यांची साथ या विकासाच्या अजेंड्याला मिळत आहे. पारदर्शक प्रशासन, १ लाख वृक्षारोपणाचा निर्धार आणि महिलांना आर्थिक केंद्रस्थानी आणण्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देणे, हे या संकल्पनाम्यातील विशेष लक्षवेधी मुद्दे ठरत आहेत.
“विकासाची दृष्टी आणि जनसेवेची ओढ असेल तर बदल नक्कीच घडतो. शिरूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे, हेच आमचे अंतिम ध्येय आहे.”
“राजकारण हे जनतेच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांना विकासाच्या वाटेवर नेण्याचे प्रभावी साधन आहे. तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस गटातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे, हेच आमचे अंतिम ध्येय आहे.”विकासाची दृष्टी आणि जनसेवेची ओढ असेल तर बदल नक्कीच घडतो. –दिपाली राहुल गव्हाणे (उमेदवार: तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट)
दिपाली राहुल गव्हाणे यांचा हा ‘संकल्पनामा’ केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो भविष्यातील समृद्ध शिरूरची नांदी असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच आज गावोगावी त्यांच्या व्हिजनची ‘चर्चाच चर्चा’ सुरू आहे.
