मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि भव्यतेत कुठेही कमी नाही.
घरात सुंदर संगमरवरी घुमट, कोरीव खांब, कमानीदार दरवाजे आणि खास प्रेमभावना असलेली रचना आहे. हे घर एका शाळेच्या आवारात बांधण्यात आलं आहे, जी शाळा आनंद चौकसे यांनी स्वतः सुरू केली होती.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कंटेंट क्रिएटर @priyamsaraswat यांनी तो शेअर केला आहे. या व्हिडीओत घराचं सौंदर्य आणि चौकसे दाम्पत्याचं प्रेम अगदी स्पष्टपणे दिसून येतं.
जसा ताजमहाल प्रेमाचं प्रतीक आहे, तसंच हे घरसुद्धा एका सामान्य माणसाच्या अपार प्रेमाचं सुंदर उदाहरण ठरत आहे.
https://www.instagram.com/reel/DK3aRUgJlJI/?igsh=MW51NTdiM29kNnY2eg==
घराची वैशिष्ट्ये: हे घर 4BHK असून पूर्णपणे पांढऱ्या मकराना संगमरवरापासून बांधलेलं आहे.
घरात एक सुंदर घुमट (डोम), नक्षीकाम केलेले खांब, कमानीदार दरवाजे आणि आकर्षक फर्निशिंग आहे.
याची रचना आणि सजावट पाहून खरं ताजमहाल पाहत असल्याचा अनुभव येतो.
घराचा बाह्य देखावा अगदी ताजमहालसारखा असून, आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे.
हे घर एका शाळेच्या आवारात बांधलेलं आहे, जी शाळा आनंद चौकसे यांनी स्वतः सुरू केली आहे.
या घरात सुंदर घुमट, कोरीव खांब, कमानीदार दरवाजे, तसेच पुस्तकालय, मेडिटेशन रूम आहेत. हे घर त्यांच्या स्वतःच्या शाळेच्या परिसरात उभारले गेले असून, ₹2 कोटींच्या खर्चातून आणि तीन वर्षांच्या मेहनतीनं बांधलं गेलं आहे.
सोशल मीडियावर याचा व्हिडीओ 1 कोटीहून अधिक पाहिला गेला, ज्यात आनंद त्यांच्या पत्नीची आठवण म्हणून हे घर समर्पित असल्याचे सांगतात:
प्रेमाचं प्रतीक म्हणून बांधलेलं घर : जसं शाहजहानने आपल्या पत्नी मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल उभारला, तसंच आनंद चौकसे यांनीही आपल्या पत्नीच्या आवडीनुसार तिच्यासाठी हे घर उभारलं आहे. त्यांच्या मते, हे घर त्यांच्या परस्पर प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे.