सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मी कष्टाचंच खाईन.” हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत त्याच्या अदम्य आत्मविश्वासाला सलाम केला.
अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर हेमा शर्मा ही नेहमीच गरजू, वंचित आणि पीडित लोकांना मदतकार्य करत असते. तिच्या एका मदतकार्यादरम्यान ही हृदयस्पर्शी घटना घडली. एका गरीब वस्तीत मदत वाटप सुरू असताना, तिथे एक टोपी घातलेला, सायकल गाडा चालवणारा मुस्लिम व्यक्ती येतो. हेमा त्याला मदत देऊ करते, पण तो ती नाकारून पुढे निघून जातो.
https://www.facebook.com/share/r/1EXrcGTDvV/
हेमा शर्मा पुन्हा त्याच्याकडे जाते आणि त्याच्याशी संवाद साधते. ती त्याला विचारते, “तुम्ही आमच्याकडून मदत का घेत नाहीत?” त्यावर तो व्यक्ती अत्यंत स्पष्टपणे सांगतो, “आम्ही मेहनतीचं खातो, कुणाचं घेत नाहीत. मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मी कष्टाचंच खाईन.”
हेमा त्याच्या स्वाभिमानाने भारावून जाते. ती त्याला भावनिक आवाहन करते, “मी तुमची बहीण आहे… बहिणीचा मान ठेवणार नाहीत का? हे माझं प्रेम आहे.” यावर तो व्यक्ती थोडा विरघळतो, पण आपल्या निश्चयावर ठाम राहतो. तो म्हणतो, “मदत नको… तुम्ही एवढं म्हणालात तेच खूप झालं.” हेमा त्याला पैसे देऊ करते, तेव्हाही तो नम्रपणे नकार देतो आणि म्हणतो, “तुमचे आशीर्वाद आहेत… मी खाणार तर मेहनत करूनच.”