Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
गोळीबार एक कंगोरे अनेक! ठेका घुंगराचा, आवाज गोळीबाराचा; भाऊ आमदार मांडेकरांचा अन् बदनाम केला भाऊ आमदार माऊली कटकेंचा
आमदार माऊली कटके यांच्यासह भाऊ अनंता कटके यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल पुणे, २५ जुलै २०२५: दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या…
वारकरी शांताराम गव्हाणे यांचे दुःखद निधन; आदर्श कुटुंबप्रमुख हरपला
डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून,…
सातारा हादरलं! एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने शाळकरी मुलीच्या गळ्यावर ठेवला चाकू, थरारक VIDEO व्हायरल
सातारा: एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने सातारा शहरात (Satara City) अक्षरशः दहशत माजवली. एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून त्याने तिला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे केवळ सातारा पोलीस प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. “महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय? इथे कायद्याची…
पुणे जिल्हा परिषद निवडणूक ‘आखाडा’ जोमात, ‘मतदार राजा, तुम्हाला यावाच लागतंय,आखाड पार्टीचं मटण खावाच लागतंय ‘
जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची अनिश्चिती, तरीही गटबांधणी जोमात! कोरेगाव भिमा (ता. शिरूर): पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग ग्रामीण भागात जोरदार वाजू लागले आहे. प्रत्येक गटातील इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली असून, आपली ताकद दाखवण्यासाठी ‘आखाड पार्ट्यां’चा धडाका सुरू केला आहे. या पार्ट्या केवळ स्नेहभोजन नसून, आगामी निवडणुकीतील संभाव्य विजयाचा अंदाज घेण्यासाठी आखलेली एक रणनीतीच…
संत निरंकारी मिशनतर्फे शिक्रापूर येथे रक्तदान शिबिर; १४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिक्रापूर, (ता. शिरूर)सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारे शिक्रापूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.रक्तसंकलनाचे कार्य यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले. या शिबिराचे उद्घाटन…
राज्य गुणवत्ता यादीत शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश
शिक्रापूर, (ता. शिरूर): पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथील १९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, राज्य गुणवत्ता यादीत सुयश उगले याने थेट ९ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या यशामुळे शाळेच्या शिष्यवृत्ती यशपरंपरेला अधिक बळ मिळाले आहे. शाळेचे एकूण २० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या गुणवत्तेची…
पुण्यात राजगड येथे भाताच्या शेतीतील चिखलात अडकले ११ ट्रॅक्टर
पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीच्या वेळी एक विचित्र आणि थोडी गंमतीशीर घटना घडली आहे. भात लावण्यासाठी शेतात गेलेला एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर रुतला. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी दहा ट्रॅक्टर आणले, पण दुर्दैवाने तेही त्याच चिखलात एकामागोमाग एक अडकले. यामुळे एकूण ११ ट्रॅक्टर चिखलात फसले!चिखलाचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यांची अडचणया अनपेक्षित घटनेमुळे…
आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा ज्येष्ठ नागरिकांना ‘काठीचा आधार’
शिक्रापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन शिक्रापूर (ता.शिरूर) भूमीतून सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय आज लिहिला गेला. शिक्रापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत, आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हृदयस्पर्शी पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधार मिळावा म्हणून काठी वाटप करण्यात आले. हा केवळ एक वस्तू वाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर ज्येष्ठांच्या आयुष्यात ‘आधार’ बनून त्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देणारा एक…
सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम
२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…
धक्कादायक! छांगूर बाबाने १५०० हिंदू महिलांचे केले धर्मांतरण, महाराष्ट्र कनेक्शनने खळबळ
विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना केले लक्ष्य , उत्तर प्रदेश या महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने उडाली मोठी खळबळ उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा याच्या धक्कादायक कृत्यांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचे धर्मांतराचे रॅकेट आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही हादरली आहे. जलालुद्दीनने १५०० हून…
