Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
सुखाने जगायचे असेल तर जीवनमूल्ये उच्च दर्जाची असावीत: इंद्रजित देशमुख
प्रतिनिधी: राजाराम गायकवाड शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे, उपसरपंच वंदना भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र…
सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन
सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व…
डिंग्रजवाडीच्या सरपंचपदी प्रगतशील शेतकरी प्रसाद गव्हाणे यांची बिनविरोध निवड
गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – नवनिर्वाचित सरपंच प्रसाद गव्हाणे डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे एकमताने आणि शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत प्रसाद शांताराम गव्हाणे यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी प्रसाद गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, त्यांची निवड…
कोरेगाव भीमा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ५०० गणेश मूर्तींचे विसर्जन
आरएसएस ने साधला पर्यावरण संवर्धन, श्रद्धा आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती पाणी ओसरल्याने उघड्या पडल्या होत्या. अशा ५०० हून अधिक श्री गणेशाच्या मूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्रित करून मोठ्या भक्तिभावाने व आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित करत सामाजिक बांधिलकीचे आणि धार्मिक कृतज्ञतेचे…
हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन
कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा…
अपशिंगे मिलिटरीत लोकनियुक्त सरपंचांविरोधात गावकऱ्यांचे गुप्त मतदान
अविश्वास ठराव २५६ मतांनी मंजूर, जिल्ह्यातील पहिलीच घटना सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावात शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मतदान प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव प्रथमच मंजूर करण्यात आला. या घटनेने केवळ अपशिंगेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. गावातील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. लोकनियुक्त सरपंच निवडून…
युवकांनो, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या: प्राचार्य डॉ. संजय चाकणे
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रनिष्ठा आणि समर्पणाची भावना असणाऱ्या युवकांची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि शैक्षणिक संशोधन…
शिक्रापुरातील श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श
प्रतिनिधी राजाराम गायकवाड गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा मानाचा तुरा शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र…
कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय
डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात…
कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील…
