कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील विद्यार्थ्याने मराठी एकांकिका नाटक सादर करत तालुका ,जिल्हा व आता राज्य स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून कोरेगाव भिमा येथील शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यात चमकवल्याने त्याच्यावर कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा २२ सप्टेंबर रोजी पार पडली.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव भिमा शाळेचा विद्यार्थी शिवंश अतुल मोटे याने प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ३१ शाळांनी सहभाग घेतला होता तर २७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले विविध कलागुण सादर केले. यामध्ये चार गट होते.यातील छोट्या गटात छञपती शिवाजी महाराजांवरील एकांकिका सादर करत शीवंश मोटे याने प्रथम क्रमांक मिळवल्याचे स्पर्धेचे परीक्षक बनकर मॅडम व मिठारी मॅडम यांनी जाहीर केले.
यासाठी त्याला शाळेचे मुख्याध्यापक पवार सर वर्ग शिक्षिका पराड मॅडम, मिडगुले सर, रासकर सर गव्हाणे सर,नागरे सर, जकाते सर, शिंदे सर तसेच कुलकर्णी मॅडम, बोराडे मॅडम, भुजबळ मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्याच्या या यशाबद्दल कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे यांनी त्याचे फेटा बांधत अभिनंदन केले.यावेळी ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ व इतर मान्यवर उपस्थित होते.