शिक्रापूर (ता. शिरूर) येथे श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील श्री संत गाडगेबाबा लॉन्ड्री असोसिएशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे जप्त विविध ठिकाणी गरजूंना किराणा साहित्य तसेच विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समजोपायोगी पुण्यतिथी करण्यात आली.
आनंद आश्रम शाळा येथे मिठाई वाटप कार्यक्रम – तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना गोड पदार्थ जिलेबी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

गुरुकुल वस्तीगृह, कासारी फाटा किराणा व मिठाई वाटप – आशीर्वाद ट्रस्ट यांच्यावतीने संचलित गुरुकुल वस्तीगृह, निमगाव महाळुंगे रोड येथे ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर, वंजारी समाज आणि भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, तेल, डबे, कडधान्य, गूळ, जिलेबी, फरसाण, चणाडाळ आणि बिस्किट यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, दीपक ससाने, धनंजय ससाने, सूर्यवंशी काका, सुरज गायकवाड, मारुती गायकवाड, अंकुश घारे यांसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांच्या समवेत श्री संत गाडगे बाबा (महाराज) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी जांभेकर सर , केरूनाना मांढरे, काळे भाऊसाहेब, थिटे ताई, महंमद भाई तांबोळी उपस्थित होते
श्री संत गाडगे महाराज यांच्या विचारांना कृतीत उतरवत, डिजे आणि बॅनर यापेक्षा वंचित आणि उपेक्षित वर्गाच्या मदतीला प्राधान्य देत ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अशा उपक्रमांतून गाडगे महाराजांचे विचार आणि कृतिशीलता जपण्याचा पाटण केला आहे. भविष्यातही सामाजिक उपक्रम अधिक व्यापकपणे राबवणार असून सर्वसामान्य जनता व उपेक्षित व वंचित समाजबांधवांसाठी व्यापक काम करायचे आहे. – आदर्श सरपंच रमेश गडदे,शिक्रापूर