शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील एका चहाच्या दुकानातून होणाऱ्या दारूविक्रीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दारूसाठा जप्त केला. याबाबत पोलीस शिपाई उमेश देविदास जायपत्रे (वय ३२, रा.शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पूणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष गुलाबराव गायकवाड (वय ४७, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Gramin Police)

पूजा टी सेंटर मधून एक इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार मंगेश लांडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार मंगेश लांडगे, विकास सरोदे, पोलीस शिपाई उमेश जायपत्रे यांनी पूजा टी सेंटर येथे जाऊन पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.(Shikrapur Police station)