धक्कादायक ! शिक्रापुरात दुचाकी आणि पीएमपीएल बसच्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू

Swarajyatimesnews

दोन मावस भाऊ मृत यामध्ये वीस वर्षांची दोन व सोळा वर्षांच्या एका मुलाचा मृतांमध्ये  समावेश 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापुर येथे शुक्रवारी (दि. ९ मे २०२५) रात्री साडे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात अ‍ॅक्सेस १२५ दुचाकी क्र. MH १२ XG ४७९६ आणि पीएमपीएल बस क्र. MH १२ XM ८८२१ यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मृताचे चुलते विजय सुरेश शेलार, (वय४८ वर्षे) रा.शिक्रापूर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल घुमे आपल्या दुचाकीवरून प्रथमेश शेलार आणि आयुष जाधव यांना घेऊन शिक्रापुरकडून तळेगाव ढमढेरेकडे जात होता. यावेळी त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगात येणाऱ्या पीएमपीएल बस व  त्यांच्या दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत तिघांनाही गंभीर दुखापती झाला. अपघातानंतर जखमींना तात्काळ सुर्या हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय, शिक्रापुर येथे त्यांना नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या अपघातात हर्षल दिगंबर घुमे (वय २०), रा. भोईआळी, तळेगाव ढमढेरे, प्रथमेश नंदकुमार शेलार (वय २०), रा. कुंभारआळी, तळेगाव ढमढेरे, आयुष अतुल जाधव (वय १६), रा. नवयुग चौक, कामशेत-खडकाळ यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताबाबत दुचाकीस्वार हर्षल घुमेचे चुलते यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत बस चालक ऋषीकेश रमेश मुठके (रा. थिटेवस्ती, रायगड कॉलनी, खराडी, पुणे) याने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!