शिक्रापूर येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
शिक्रापूर (ता. शिरूर) समाजातील प्रत्येक स्त्री ही माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांची रणरागिणी असून स्वाभिमानाने व आपल्या कर्तुत्वाने स्त्रियांनी ते सिद्ध करायला हवे तसेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांची जागा दाखवून देत प्रत्येक स्त्रिच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायला हवे, स्त्रियांच्या अधिकारांचे रक्षण करत त्यांना समाजात सन्मानाने प्रगती करता यावी यासाठी समाजाने पुढे यायला हवे असे मत कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित माँसाहेब जिजाऊ जयंती कार्यक्रमात अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात जिजाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, संस्थेचे सभासद अंकुश घारे, ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड, पत्रकार निलेश जगताप,संतोष काळे,वंदना रामगुडे, जितेंद्र काळोखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी जिजाऊंच्या जीवनावर आधारित विचार मांडले. त्यांच्या नेतृत्वगुणांपासून प्रेरणा घेत, महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.