शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मांडवगण फराटा येथे जाहीर सभा होणार आहे.
शिरूर मतदारसंघात गुरुवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव रासाई येथे दुपारी १ वाजता आयोजित या सभेत पवार साहेब आमदार अशोक रावसाहेब पवार यांच्या प्रचारार्थ मतदारांना संबोधित करणार आहेत. या सभेची सध्या सर्वत्र चर्चा असून, सभेला मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.