संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर

Swarajyatimesnews

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत.

पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विशेष महत्त्वाची आहे. आता या दोन्ही पालख्यांच्या प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जून रोजी, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा वेळापत्रक :- १९ जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी ( प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार )

२० जून आळंदी ते पुणे,

२१ जून पुणे मुक्काम

२२ जून पुणे ते सासवड,( दिवेघाट वारकरी खेळ )

२३ जून सासवड मुक्काम

२४ जून सासवड ते जेजुरी, ( भंडाऱ्याची उधळण )

२५ जून जेजुरी ते वाल्हे, (जेजुरी खंडोबा दर्शन )

२६ जून वाल्हे ते लोणंद,(माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)

२७ जून लोणंद ते तरडगाव

२८ जून तरडगाव ते फलटण

२९ जून फलटण ते बरड

३० जून बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)

०१ जुलै नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)

०२ जुलै माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)

०३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा)

०४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)

०५ जुलै वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण)

०६ जुलै देवशयनी आषाढी एकादशी

१० जुलै पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025 :-

18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम

19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम

20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम

21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम

22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम

23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम

24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम

25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम

26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम

27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )

28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम (बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)

29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण )

30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम

1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)

2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण )

3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम

4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )

5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण )

6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान

10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!