सणसवाडी येथे खेळ रंगला पैठणीचा माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठा उत्साहात संपन्न

Swarajyatimesnews

दुर्गामाता उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देत गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप

सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी येथील मयूर नगर दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाने यंदाचा उत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा केला. माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण तर  गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप मोठ्या उत्साहात करून मंडळाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

उत्सवादरम्यान “खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या प्रथम क्रमांक सोनिया विराज बालवडकर,द्वितीय क्रमांक अनुराधा प्रकाश जाधव ,तृतीय क्रमांक रूपाली सतीश जाधव, चतुर्थ क्रमांक सारिका अनिल गोटे, पाचवा क्रमांक  राधिका कृष्णा रायकर या महिला भगिनींना माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

नवरात्र उत्सवादरम्यान मंडळाने दुर्गामाता भक्तांसाठी रेड कार्पेट स्वागत, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था यांसारख्या सोयी-सुविधा पुरवून उत्तम नियोजन केले आहे.

याप्रसंगी एम.एस.सी.बी.चे नितीन महाजन, सुमित जाधव, शिंदे साहेब, मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे, उपसरपंच राजेंद्र दरेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव यादव, माजी उपससरपंच विजयराज दरेकर मनसे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी पंडित दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनीता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर, उद्योजक प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, विठ्ठल दरेकर, नवनाथ दरेकर, बाळकृष्ण दरेकर, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे, खजिनदार रविराज जुनवणे, सचिव उत्तम दरेकर, संचालक अनिल गोटे, पंढरीनाथ गोरडे, सलीम खान, संतोष शेळके, अशोक खवले, राहुल नागरे, शरद खरात, प्रमोद गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी व दुर्गामाता भक्त उपस्थित होते. सणसवाडीतील हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, सामाजिक एकोपा आणि मदतीचा आदर्श ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!