सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री नरेश्वर शिक्षण मंडळाच्या मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळेच्या २००७ च्या बॅचचा माझी शाळा, आपलं गेट टु गेदर ,तुमच्या आमच्या आठवणी जागवत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे १७ वर्षांनी १० वी ‘अ’ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.
सणसवाडी येथील हॉटेलमध्ये आकर्षक रंगाची रांगोळी काढण्यात आली तर येणाऱ्या माजी विद्यार्थिनी व विद्यार्थिनींसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून करण्यात आली.यावेळी शालेय आठवणी जागवणाऱ्या केकची खास डिझाईन बनवून घेण्यात आली तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा देत कोणी हसवले तर कोणी रडवत स्नेह मेळावा संपन्न झाला.यावेळी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेश परिधान केला होता तर कार्यक्रमाची सांगता चविष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन करण्यात आली.
यावेळी रेखा गायकवाड, दिपाली गाडेकर, सारिका नवले, कविता यादव , सपना खांदवे, कविता सावंत, शितल सपाटे, भारती शिवले, सुप्रिया कोतवाल, रुपाली हरगुडे,गणेश दरेकर,किरण दरेकर, आबासाहेब दरेकर, राहुल तांबे, दिलीप सोनार ,शेखर दरेकर, अतुल साठे , अजित दरेकर, विनायक शिंदे, उत्तम दरेकर उपस्थित होते.