समाजासह महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव आमचे सख्खे भाऊच – अलका सोनवणे ( हरगुडे)
लोणीकंद (ता.हवेली) येथील पोलीस चौकीतील पोलीस बांधवांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला भगिनींनी राखी बांधत अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली असून कुटुंबापेक्षा समाजाला जास्त वेळ देणाऱ्या व समाजाची , महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव म्हणजे आमचे सख्खे भाऊच असल्याचे मनोगत अलका सोनवणे ( हरगुडे) यांनी रक्षाबंधन दिनी लोणीकंद (ता.हवेली) येथे केले.
पोलीस बांधव चोवीस तास समाजाच्या सुरक्षिततेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असतात. आपल्याला छोटे मोठे आनंदाचे क्षण, सन समारंभ साजरे करता येतात पण पोलीस बांधवांना सणसमारंभ कुटुंबामध्ये साजरे करता येत नाहीत. ते स्वतःला समाजाच्या सेवेसाठी समर्पित करता म्हणून आपले सण समारंभ साजरे होतात व आपण सुखा समाधानाने कुटुंबात आनंदाने राहतो याचीच जाणीव व कृतज्ञता म्हणून त स्वाभिमानि मराठा महासंघ महिला आघाडीतील महिला भगिनींनी लोणीकंद पोलीस स्टेशन, अंकित केसनंद पोलीस चौकी येथे पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करत
समाजाच्या सुरक्षितेसाठी काम करणारे पोलीस आमचे सख्खे भाऊच आहे अशा सदभावना महिला भगिनींनी व्यक्त केल्या. लोणीकंद पोलीस स्टेशन, अंकित केसनंद पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे ,पोलीस शिपाई निखील गोपाळ,चिंतामण गवळी, मोरे साहेब यांना राख्या बंधवण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अलका सोनवणे (हरगुडे), युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष, ज्योती सातव,, संघटक चंद्रकला खेडेकर, शिरूर हवेली तालुका उपाध्यक्ष अश्विनी सावंत,शिरूर हवेली तालुका कोषाध्यक्ष मीरा शिंदे, राज्य मराठी पत्रकार परिषद सलग्न महिला मंच हवेली तालुकाध्यक्ष अनिता मिटकर (मोरे) महिला भगिनी उपस्थित होत्या.