महायुतीत खळबळ….अखेर प्रदीप कंदांनि दाखल केला उमेदवारी अर्ज..

स्वराज्य टाईम्स न्यूज

प्रदीप कंदांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू शांताराम कटके यांनी अर्ज दाखल केल्याने चर्चेला उधाण

लोणीकंद (ता.हवेली) भाजपचे शिरूर  विधानसभा निवडणूक समन्वयक प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत १९८  शिरूर मतदार विधासभेसाठी उमेदवारी अर्ज दि. २९ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिरूर हवेली मतदार संघात मोठी खळबळ उडाली असून चांगलीच चुरस निर्माण झाल्याची परिस्थितीत निर्माण झाली असून ऐन थंडीत शिरूर हवेलीचे राजकीय वातावरण तापले आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

    राज्यामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांची  उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतील मागील पंधरा वर्षांपासून इच्छुक असणारे व २०१४ पासून तयारी करणारे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पि डी सी सी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला.एकेकाळी अजित पवार व सध्या भाजपा पक्षातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम केल्याने भावनिक झाले परंतु कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह व दबाव यामुळे नामनिर्देशित अर्ज दाखल करण्यात आला.

      बहुतेक विधानसभा मतदार संघात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. राज्यात दिसणारी एकी स्थानिक पातळीवर कमकुवत होते की काय ? बंडाचे निशाण दाखवत उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवारांचे बंड कसे शमवणार हे मात्र उत्सुकतेचा विषय ठरले असून उमेदवारी अर्ज माघारी ४ नोव्हेंबर असल्याने विधासभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात महायुतीचा डोलारा मजबूत व एकसंध दिसत असला तरी स्थानिक पातळीवर पोकळ वासा ठरू नये याची वरिष्ठ दाखल घेणार की बंड होणार हे आगामी काळ ठरवेल.पि डी सी सी संचालक प्रदीप कंद हे प्रबळ दावेदार मानले जात होते.मागील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून पासून मतदार संघाची बांधणी करत असून भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे तसेच मागील दोन टर्म पासून आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक असणारे भाजपचे प्रदीप कंद यांनी देखील शिरूरची जागा परंपरागत भाजपला सुटली नसल्याने नाराजी व्यक्त करीत रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) पेरणे फाटा परिसरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच केले आहे.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र भावना करत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

      उमेदवारीसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरु असताना महायुतीकडून शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर महायुतीतील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यामध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना वाघोली ते शिरूर शक्तीप्रदर्शन करीत समर्थक, सहकारी यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

शिरूर-हवेली विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून आलबेल असताना महायुतीमध्ये मात्र उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरु झाले आहे. महायुतीपुढे बंड शमविण्याची डोकेदुखी वाढणार आहे. बंडखोरी रोखण्यात महायुतीला कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कटके विरोधात कटके यांचा अर्ज दाखल –  शिरुर विधानसभा निवडणुक रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर-हवेली विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने माऊली उर्फ ज्ञानेश्वर  कटके यांना जाहीर करताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी सोमवारी (दि.२८) वसुबारसच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपाचे क्रीडाचे संदीप भोंडवे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, माजी उपसभापती रवींद्र कंद, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कामगार आघाडीचे जयेश शिंदे, रोहित खैरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!