पुण्यात एक धक्कादायक घटन घडल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.दहावीतील विद्यार्थ्यांवर शिक्षिकेने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) २७ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.A shocking incident in Pune has shaken the education sector. A sensational incident of a teacher abusing a class 10 student has come to light. In this case, the Khadak police have registered a case against the 27-year-old teacher under the Protection of Children from Sexual Offences Act (POCSO).
शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याला स्वतः सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या २७ वर्षीय शिक्षिकेला खडक पोलिसांनी गजाआड केले आहे.
गंज पेठेतील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा शुक्रवारी शाळेत दहावीच्या प्रिलियम परीक्षेसाठी आला होता. आरोपी शिक्षिका ही त्या शाळेत शिक्षिका आहे. मुले शाळेत असताना त्यांची पालकत्वाची जबाबदारी शिक्षक या नात्याने तिच्यावर असते हे माहीत असताना देखील अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी शिक्षिकेने त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.
याबाबत पीडित मुलाच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबधित शिक्षिकेला अटकही करण्यात आली. या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तोंडे करत आहेत.