कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे आणि आता आम्ही आणखी पैसे देऊ शकत नाही. आम्ही दोन्ही मुलांना आजीकडे ठेवून जात आहे, आमचा कुणावरही विश्वास नाही, असं सौरभ यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.
गंभीर आर्थिक तणावात असलेल्या सौरभ यांनी नदीत उडी घेण्यापूर्वी पत्नी मोनासोबत सेल्फी घेतला होता. हा सेल्फी त्यांनी आपल्या मित्रांना व्हॉट्सऍपवर पाठवला आणि नंतर दोघांनी गंगेत उडी घेतली. सौरभ यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांना सौरभ बब्बर यांचा मृतदेह सापडला आहे, मात्र त्यांच्या पत्नीचा शोध अद्याप लागलेला नाही.
सौरभ बब्बर यांचे सहारनपूरच्या किशनपुरा भागात साई ज्वेलर्स नावाचे दुकान होते. त्यांचा मृतदेह हरिद्वारच्या रानीपूर भागात गंगा नदीत आढळला. मृतदेहासोबत सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जाच्या तणावामुळे आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
सौरभ बब्बर काही दिवसांपासून गायब होते, आणि ते ‘गोल्ड कमिटी’ नावाने ओळखले जात होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सौरभ यांच्या चिठ्ठीत आणि सेल्फीमध्ये १० ऑगस्ट २०२४ ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मुलांना आजीकडे सोडून गेल्याचे आणि कर्जदारांच्या अत्याचारामुळे जीवन संपवल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.