मागील ८ वर्षांपासून श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम
लोणीकंद (ता. हवेली) न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुल व श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले असून अनेक विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त टक्के मिळाले असून दहावीतील चिन्मय जाडे या विद्यार्थ्याने ९७%गुण तर बारावीतील बारावीमध्ये सुनोवा डे या विद्यार्थ्यांचा ९६% गुण मिळवुन प्रथम कमांक मिळवत उज्वल यश संपादन केल्याने श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारूती रामचंद्र भुमकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस विद्यार्थ्यांस शुभेहा दिल्या.

, CBSEच्या दहावी–बारावी आणि MAH HSC फेब्रुवारी 2025 परीक्षेत पुणे जिल्ल्यातील वाघोली‑लोणीकंद परिसरातील न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुलचे 23 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून अपवादात्मक कामगिरी केली. दहावीत चिन्मय जाडे (97%) प्रथम, सिध्दी रावत (95%) द्वितीय व सुष्टी गायकवाड (94.20%) तृतीय क्रमांक मिळवणारे ठरले. बारावीत सुनोवा डे (96%) ने पहिले, अर्तागनन सिंघ (95.40%) द्वितीय व आकृष्टी ओजस्वी (95.20%) तृतीय क्रमांक पटकावले, तर 47 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्याबरोबर प्रथम श्रेणीही मिळवली.
तसेच, श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजने अखेरच्या तब्बल 8 वर्षांपासून कायम ठेवलेली 100% निकालाची परंपरा या वर्षीही जिंकल्याने कॉलेज परिसराबरोबरच शिक्षणसंस्थेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भुमकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि प्राचार्या रितीका नायडू, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ढंगेकर व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन केले.