धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणाची निघून हत्या.. कोयत्याच्या वर्मी घावाने कवटी फुटली, डाव्या हाताचे मनगट तुटले

Swarajyatimesnews

अंबप (ता. हातकणंगले)येथील  पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास  पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) याच्यावर धारदार कोयत्याने आठ सपासप वार केले यामध्ये डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली तसेच डाव्या हाताचे मनगट तुटले यामध्ये  त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.( In front of the water tank in Ambap (Tal. Hatkanangale), around 7 pm, three youths, out of a past enmity, stabbed Yash Kiran Dabhade (age 19, resident of Ambap, Tal. Hatkanangale) eight times with a sharp sickle. He sustained eight stab wounds to the head, resulting in a fractured skull and a broken wrist on his left hand, resulting in his death.)

   अंबप-पेठवडगाव रस्त्यावर उत्तरेला मोकळ्या मैदानाच्या कडेला पाण्याची टाकी आहे. तेथील कठड्यावर दररोज सायंकाळी गावातील मुले एकत्र बसलेली होती त्यामध्ये यश दाभाडे होता. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण तेथे आले. 

त्यांनी बेसावध बसलेल्या यशवर अचानक कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ला झाल्याचे पाहून तेथील मुले घाबरून पळून गेली. हल्लेखोरांनी यशवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर ते मोटारसायकलवरून महामार्गाच्या दिशेने पळून गेले. हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच ठार झाला.

दरम्यान, पाण्याच्या टाकीतून पाणी नेण्यासाठी एक महिला गेली असता तिला यश रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिने जवळच असणाऱ्या तरुणांना हा प्रकार सांगितला. खून झाल्याचे वाऱ्यासारखे गावात पसरले. त्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक निरीक्षक संजय माने व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथक, शोधपथकही आले. घटनास्थळी पंचनामा करून नवे पारगाव येथे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यश याच्या मागे आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. त्याचे वडील इचलकरंजी येथे बेकरीत कामास आहेत. यश दाभाडे याच्या घरापासून अवघ्या शंभर मीटरवर हल्ला झाला.

यश वर होता गुन्हा दखल –

दरम्यान, गावातील एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी यश दाभाडे याच्याविरोधात सप्टेंबर २०२३ ला पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवले होते. सहा महिन्यांपूर्वीच तो पुन्हा गावात आला होता. या वादातूनच इतर करणांहून हल्ला झाला का, याचा तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!