महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा  सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Swarajyatimesnews

विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका 

शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत न्यायाधीश पदावर नियुक्त शुभम विकास कराळे प्रशालेचा २०१४ विज्ञान शाखेचा विद्यार्थी,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदावर नियुक्त सागर सुखदेव नळकांडे एस.एस.सी बॅच २०१२ चा विद्यार्थी व सहाय्यक उपनिरीक्षक पदावर नियुक्त मंदार रमेश कळमकर यांचा भव्य सन्मान प्राचार्य शसोनबापू गद्रे , शिक्रापूर चे सरपंच रमेश गडदे माजी उपसरपंच सुभाष खैरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  मंगेश शेंडे व आदर्श ग्रंथपाल संतोष काळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

       आज प्रशालेचा वार्षिक निकाल ही जाहीर करण्यात आला,प्रशालेचे प्राचार्य गद्रे सर यांनी वार्षिक निकाल सादर केला.

      या कार्यक्रमाला उपप्राचार्य सुरेश गंगावणे, पर्यवेक्षक पी जे मेरगळ सर , सुनिल मांढरे,सूरेश खुरपे चंद्रकला मांढरे,तसेच ग्रामस्थ,पालक,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

     या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मांढरे सर यांनी केले, सुत्रसंचालन माऊली कुंभार सर यांनी केले तर प्रा.नानासाहेब गावडे सर यांनी आभार मानले.

“गावाच्या मातीतून अधिकारी घडत आहेत, हे आमचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. आजच्या सत्काराने नव्या पिढीला नवी प्रेरणा मिळेल. या यशाचे पडसाद केवळ शिक्रापूरपुरसह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देतील,”— आदर्श सरपंच रमेश गडदे, शिक्रापूर ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!