मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ
वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच खात्यावर जमा झाल्याने महिला भगिनींनी महाराष्ट्र शासनाचे व मातोश्री उद्योग समूहाचे उमेश भंडारे, सचिन भंडारे व योगेश भंडारे यांचे आभार मानले.
मातोश्री एन्टरप्रायजेसचे ( महाराष्ट्र -पुणे शिरूर ) डिस्ट्रीब्यूटर सचिन भंडारे यांनी वढू बुद्रुक येथे महिला भगिनिंसाठी विनामूल्य एअरटेल पेमेंट बँक खाते काढून दिले तसेच डीबिटी लिंक करून देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले होते.यावेळी एअरटेल पेमेंट बँकेचे अधिकारी हब हेड भरत कडलग ,डिस्ट्रीब्यूशन हेड सचिन तोमर, अभिषेक सर ,झोनल मैनेजर दिगंबर सर ,झोनल टेरिटरी मैनेजर – मनोहर सर ,सीजीओ स्नेहा मॅडम उपस्थित होते.
या एकदिवसीय कँपचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व महिलांचे माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म वैध ठरले असून महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा झाल्याने महिला भगिनींनी मातोश्री समूहाचे आभार मानले.