Category: Latest Update
शिक्रापूरमध्ये पत्रकार बांधवांचा दिवाळी भेट देऊन सन्मान – कर्तव्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!
शिक्रापूर (ता. शिरूर) दिवाळीच्या मंगल पर्वावर शिक्रापूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा आदर्श उपक्रम कर्तव्य फाउंडेशनतर्फे यंदाही उत्साहात पार पडला. आदर्श सरपंच रमेश गडदे व कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उपस्थित पत्रकारांना मिठाई, पेन, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पत्रकारांच्या कार्याला मान्यता देत…
महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला नामांकन अर्ज
माऊली कटके यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण शिरूर – पुणे जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा व चुरशीचा असलेल्या शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राहुल पाचर्णे, अरुण गिरे, रवींद्र काळे,दिलीप वाल्हेकर, गणेश कुटे, भगवान शेळके ,सुधीर फराटे, रामभाऊ सासवडे उपस्थित होते. मंगळवार…
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, वीस लाख रुपयांची रक्कम खात्यावर जमा
कर्मचाऱ्यांना कपडे,मिठाई व डबल पगार तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांनाही दिवाळीनिमित्त मिठाई वाटप कोरेगाव भीमा (ता. शिरूर) – कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी डबल पगार देत आनंदाची पर्वणी साजरी करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे कर्मचाऱ्यांना कपड्यांसह, दिवाळी मिठाईचे वाटप करण्यात आले असून, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ चे वेतन तसेच दुहेरी बोनस मिळाल्याने…
शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा
खेड तालुक्यातील शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. ही घटना रविवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली.दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले. अनिकेत पंडित दौंडकर (वय २५, रा. शेलपिंपळगाव, खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दौंडकर हे भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत…
सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन
सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात…
३९६ विजचोरांवर महावितरणची एकाच दिवशी कारवाई
सोलापूर जिल्ह्यात महावितरणने मंगळवारी (दि.१)३९६ वीजचोरांवर एकाच दिवशी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे, तर विजेचा गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात, एकाच दिवशी जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली. १७७९…
MPSC च्या पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत धाराशिवच्या महेश घाटुळे यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड
चिकाटी, कठोर परिश्रम, आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील घारगावच्या डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या निकालात पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत उपजिल्हाधिकारी पदावर यशस्वी झेप घेतली आहे. अवघ्या २९ वर्षांच्या महेश यांनी आपल्या या यशाने कळंब तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.(MPSC) महेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत…
चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी
चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…
राज्यस्तरीय स्पर्धेत कोरेगाव भिमाचा विद्यार्थी राज्यात प्रथम
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील विद्यार्थ्याने मराठी एकांकिका नाटक सादर करत तालुका ,जिल्हा व आता राज्य स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून कोरेगाव भिमा येथील शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यात चमकवल्याने त्याच्यावर कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित…
सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…
