Category: Latest Update
Leopard लग्नघरा शेजारी आली बिबट मादी, पाहुण्यांमध्ये गोंधळ, भीती…
जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे एका लग्नघरात बुधवारी पहाटे चित्तथरारक घटना घडली. दौलत खंडागळे यांच्या मुलाच्या लग्नासाठी घरी नातेवाईक आणि पाहुण्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्वजण लग्नाच्या तयारीत मग्न असतानाच घराजवळ लावलेल्या पिंजर्यात अचानक बिबट मादी अडकली. पहाटे चार वाजता या प्रकाराचा उलगडा झाल्याने घरातील आणि पाहुण्यांच्या आनंदाच्या वातावरणात भीतीचे वातावरण पसरले. घटना कळताच वन विभागाला…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात एकाला 84 लाख 34 हजारांना ऑनलाईन गंडा
शिरूर तालुक्यात एका नोकरदाराला रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 84 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. मूळच्या चंद्रपूर येथील असलेल्या व सध्या शिरूर शहरात बागवान नगर मध्ये राहत असलेल्या प्रकाश विनायक धामणकर या 43 वर्षीय व्यक्तीला अशा पद्धतीने गंडविण्यात आले आहे.(In Shirur taluka, a government employee was duped of Rs 84 lakh…
दुचाकीस्वारासह सहप्रवाशालासुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा दोघांनाही दंड, वाहतूक विभागाचे आदेश
विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.(The number of accidents involving two-wheeler riders and their passengers without…
भीषण अपघात ! चाकण शिक्रापूर मार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
चाकण – शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोहितेवाडी (ता. खेड गावच्या हद्दीत) भरधाव अवजड कंटेनरने समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला धडक दिली. अपघातात मिनी टेम्पो वाहनाचा चालक व एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर भरधाव कंटेनरने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन रस्त्यालगतच्या कंपनीचे कंपाउंड तोडून नुकसान केले.On the Chakan-Shikrapur State Highway, a speeding heavy container hit a…
धक्कादायक!”आईने गळफास घेतला, मुलांचे मृतदेह पाण्यात आढळले बॅरलमध्ये”
घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून, घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्ही लहान मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव असून, श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटना उघडकीस…
मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…
शिरुर तालुक्यात जबरी दरोडा; चोरांनी महिलेचे कान कापून सोन्याचे झुबे केले लंपास
शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in…
शिक्रापूर येथे माऊली सेवा मंडळाची भक्तीमय परंपरा, यंदा ७० दिंड्यांचे उत्साहात स्वागत!
माऊली सेवा मंडळाची १८ वर्षांची सेवा अखंड अन्नदान सेवा शिक्रापूर (ता. शिरूर) आळंदीच्या कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव अनुभवण्यासाठी लाखो भाविक वारकरी पायी वारीसाठी निघाले आहेत. याच पवित्र वारीदरम्यान, शिक्रापूर गावाने आपली १८ वर्षांची अन्नदान सेवा परंपरा जपत यावर्षी तब्बल ७० दिंड्यांचे उत्साहाने स्वागत केले. माऊली सेवा मंडळाच्या…
UGC NET EXAM 2024- जानेवारीत होणार; 10 डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून 1 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.(UGC NET EXAM 2024) विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर निवडण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा महत्त्वपूर्ण…
वाघोली परिसरात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षाची मुलगी गर्भवती
वाघोली ( ता.हवेली) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून अल्पवयीन मुलाची शेजारी राहणाऱ्या मुलीशी एकमेकांशी शारीरीक जवळीक वाढली. शरीरसंबंध झाले. त्यातून १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पिडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट…
