कोरेगाव भीमा येथे ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न

Swarajyatimesneww

ऊसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते – विकास चव्हाण

दिनांक १० फेब्रुवारी 

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा आणि विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी शेती विषयक विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

    या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते विकास चव्हाण यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाच्या प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितल्या. त्यांनी पाचट कुट्टीपासून पाचट पूर्णपणे कुजवण्यापर्यंतच्या पद्धती त्यांच्या प्रत्यक्ष शेतातील अनुभवावर आधारित सादर केल्या. “उसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुवर्णा आदक यांनी Agristak व इतर योजनांची माहिती दिली, तर  धनश्री चासकर यांनी नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीमार्फत जीवाणू औषधांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी केले होते तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंद यांनी केले, तर सरपंच  संदीप ढेरंगे यांनी मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाला चेअरमन अशोक गव्हाणे, व्हाइस चेअरमन रामदास कांबळे, सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे,माजी पंचायत समिती सदस्य पी के अण्णा गव्हाणे,माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, कैलास सोनवणे, नारायण फडतरे, मा. सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, संजय काशीद, माजी चेअरमन पंडित ढेरंगे, अशोक गव्हाणे, देविदास गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ ,शेतकरी व विविध क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते.

“कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी बांधवाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने – कृषी तंत्रज्ञान, योजना, अनुदान, कर्ज व बाजारपेठेतील सुधारणा यांच्यामार्फत आर्थिक समृद्धीची नवी दिशा निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. आधुनिक ज्ञानाचे प्रशिक्षण, कृषी पर्यटनाचे आयोजन व उद्योगधंद्यांचे बळकट नेटवर्किंग यामुळे शेतकरी बांधवांची प्रगती त्यातून कृषी मालावर आधारित उद्योग धंदे उभारणाऱ्या शेतकरी उद्योग व उद्योजकांना भेटी देणे यासाठी प्रयत्न करणार आहे.”- सरपंच संदीप ढेरंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!