राज्यातील पहिली ग्रामपंचायत जिने दिव्यांगांना त्यांचा संपूर्ण निधी दिला – धर्मेंद्र सातव
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करणारी व सगळा निधी देणारी ग्राम पंचायत असून इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न म्हणजे माणुसकी, कर्तव्य व प्रामाणिक कामाचे प्रतीक असून शिरूर हवेलीच्या विकासाचा आलेख उंचावत ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे करत निष्ठा जपली असून पूर्वी दुर्गंधी येणार गाव म्हणून कोरेगाव भीमाची ओळख पुसण्यासाठी व पावसाचे पाणी साठून ट्रॅफिक जॅम होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय केल्याचे समाधान वाटत असल्याचे मत आमदार अशोक पवार यांनी दिव्यांग निधी वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रसंगी प्रहार गटविकास अधिकारी महेश डोके, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे धर्मेंद्र सातव, अनिता कदम, सरपंच संदीप ढेरंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणेयांच्या प्रमुख उपस्थित निधी वितरीत करण्यात आला.
आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना २०१८ ते २०२४ पर्यंतचा ३२ लाख रुपयांचा दिव्यांगाचा निधीचे वाटप सरपंच संदिप ढेरंगे यांच्याअध्यामातून करण्यात आले.या एकी शिरूर हवेली मध्ये कोट्यवधी रूपांची विकास कामे करत विकासाचा आलेख उंचावत ठेवला असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
यावेळी दिव्यांग बांधवांना फेटा बांधून स्वागत करण्यात आले तर प्रास्ताविकात ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ५ टक्के लाभाची माहिती दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मध्याजर कंद यांनी केले.यावेळी चेअरमन अशोक गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्या रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, माजी सदस्या अंजली ढेरंगे, ग्राम विकास अधिकारी सदानंद फडतरे, नितिन गव्हाणे, राहुल ढेरंगे ,रवींद्र फडतरे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ, जयकांत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या २०१८ ते २०२४ असा ३२ लाखांचा निधी वितरीत केल्याचा मनोमन आनंद होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन विकासाची कामे करण्यात येत आहे. – सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत कोरेगाव भिमा