खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली बापू वाडेकर यांची आदर्श लोकनियुक्त सरपंच अश्विनी संदिप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी उपसरपंच संगीता प्रताप वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली वाडेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणूक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी स्वाती माळी यांनी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीच्या कार्यक्रमाला आदर्श सरपंच अश्विनी साबळे, माजी उपसरपंच संगीता वाडेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप डोमाळे, प्रवीण तांबे, दिपाली आरेकर, सुप्रिया साबळे, कविता पानसरे, संतोष वाडेकर, सत्यवान वाडेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वॉर्ड नंबर चार मधील मतदारांच्या आणि बहुळ ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मला मिळालेल्या उपसरपंच पदाच्या संधीचे मी निश्चितच गावासाठी उपयोग करणार असून सर्वसामान्य व गोर गरीब नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वीच माझ्या कुटुंबाने गावाच्या जलजीवन योजनेसाठी पाच हजार स्क्वेअर फूट जागा दिली आहे. यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देते.— नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली बापू वाडेकर