कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसरकारवर जोरदार टीका
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) अनेक जण निवडणुकीत विचारायचे तुमच्याकडे काय आहे? ना पक्ष ना चिन्ह कसे निवडून येणार? आम्ही त्यांना सांगायचो, आमच्याकडे शरद पवार आहेत. दुसऱ्या नेत्यांनी अंगावर गुलाबी जॅकेट चढवलंय. त्यांनीही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी ते गद्दारीचा रंग कसा लपवणार आहेत? अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी तळेगाव ढमढेरे येथील ॲड अशोक पवार यांच्या प्रचार सभेत केली.
महिला अत्याचारात झालेली वाढ,शेतकरी आत्महत्या,पिकाला बाजारभाव, सोयाबीन भाव, बेरोजगारी, गुजरातला जाणारे प्रकल्प यावर राज्य सरकारला लक्ष करत चांगलीच टीकेची झोड कोल्हे यांनी उठवली.पराभव दिसल्यावर वोट जिहाद आणला जात असून हा काळया कातळाचा सह्याद्री आहे येथे बळकट हातात मशाल पेटणार त्यात तुतारी वाजणार आहे.
यापुढे कोल्हे यांनी लोकसभेला तुतारी जशी जोरात वाजली तशी पुन्हा एकदा लाखाच्या फरकाने वाजली पाहिजे.गंमत बघा जे विकासासाठी तिकडे गेले होते, ज्यांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले, जे विकासावर गप्पा मारत होते त्यांना आज सागावं लागतंय बटेंगे तो कटेंगे … आणि हे म्हणतात आम्हाला मान्य नाही, छत्रपती शिवरायांनी १२ बलुतेदार १६ अलुतेदार यांना सोबत घेतले स्वराज्य स्थापन केले. इथे हे चालणार नाही जनता तुम्हाला दाखवून देईल असा इशारा देत एक फुल दोन हाफ म्हणत शिंदे,फडणवीस व अजित पवारांचा कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला.
तुम्ही आमच्याकडे पोट भरायला येताय, आणि आम्हाला शिकवताय , बटेंगे तो कटेंगे – तुमचे उत्तर प्रदेशवाले निम्म्यापेक्षा जास्त पोट भरायला महाराष्ट्रात येतात आणि तुम्ही आम्हाला शिकवणार बटेंगे तो कटेंगे. जे शेतकऱ्यांच्या प्रपंचात मूठ माती घालतात, त्यांना सोडायचं नाही,मग ते गुलाबी जॅकेटवाले असो नाहीतर कुणी…. असे कोल्हे म्हणाले.
फडणवीस शर्सयत कुठली करताय..सरकारच येणार नाही – रकारच येणार नाही तर शर्यत कुठली करताय देवेंद्र फडणवीस लय हुशार माणूस आहे. ते म्हणाले ‘मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही..’ सरकारच येणार नाही हे अप्रत्यक्ष मान्य करत असून फडणवीस सत्ताच येणार नाही तर शर्यत कुठली करताय, असा टोला कोल्हे यांनी फडणवीसांना लगावला.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी मी कधी आमदारकी मिरवली नाही मतदार संघात कुटुंबाचा घटक म्हणून काम केले सुखदुःखात सहभागी झालो आहे.तालुक्यात सुबत्ता शरद पवार यांच्यामुळे आली असून मी गद्दार न होता त्यांच्याशी निष्ठावान म्हणुंतहीलो खूप त्रास सहन केला पण फितूर झालो नाही.मतदार संघात विकास कामे केली असल्याचे प्रतिपादन केलेयावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस व इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.