काशी अयोध्या मोफत दर्शन यात्रा टप्पा ३ रा संवाद मेळाव्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद

Swarajyatimesnews

लोणीकंद–पेरणे गटाचा विश्वासदर्शक कृतिशील हक्काचा माणूस म्हणून किरण सकोरेंना भरघोस आशीर्वाद

पेरणे फाटा (ता. हवेली) दिनांक १८ नोव्हेंबर सर्वसामान्यांच्या दारी विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी तळमळ असणारे, समाजाशी हृदयाची नाळ जपणारे आणि सुख-दुःखात धावून येणारे नेतृत्व म्हणून पै. किरण साकोरे यांच्यावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत असून प्रदिप दादा कंद युवा मंच व किरण साकोरे मित्र परिवार यांच्यावतीने काशी–अयोध्या मोफत दर्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित संवाद मेळाव्यात पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील नागरिकांकडून साकोरे यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

“प्रत्येक गावातून ‘लीड’ देणार!”, किरण साकोरे यांच्यावर जनतेचा बसलेला हक्काचा विश्वास — मेळाव्यात बोलताना माजी संचालक कल्याण शिंदे म्हणाले,“किरण साकोरे हा दोन महिन्यांत उगवलेला नेता नाही, हा आपल्या भागातील अनेक वर्षांपासूनचा हक्काचा माणूस आहे. कर्तृत्ववान, शब्दाला जागणारा, कामातून ओळख निर्माण करणारा आपल्या हक्काचा व घरातला तरुण आहे. पेरणे–लोणीकंद गटातून प्रत्येक घराघरातून, प्रत्येक वस्तीमधून व गावातून आम्ही मोठ्या मताधिक्याने ‘लीड’ देणार आहोत.”

“देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद असून किरण साकोरेंची राजकीय स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील”: “किरण साकोरे यांनी यात्रेच्या माध्यमातून जे पुण्याचे कार्य केले, ते लोक विसरणार नाहीत. श्रीरामाचा, काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम त्यांच्यावर आहे. त्यांची राजकीय स्वप्नं लवकरच साकार होतील.”. – रविंद्र कंद, माजी उपसभापती पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती

किरण साकोरे सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता वैभव शिंदे“किरण साकोरे हे केवळ आश्वासन पूर्ण करण्यासह विकास कामे करणारे आहे. सर्वसामान्यांच्या मनातील नेतृत्व असून गेली दहा वर्षे ते लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. अर्ध्या रात्री समस्येला धावून येणारा, गरिबांच्या घरात विकासाची गंगा दाराशी आणणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणजे किरण साकोरे.”“या गटाचा सर्वांगीण विकास घराघरात दिसणार!”माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, यांच्या मार्गदर्शनाखाली साकोरे यांच्या नेतृत्वात लोणीकंद–पेरणे गटाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी जाहीर केला.

समाजातील वेदना ओळखणारा, तरुणांना चांगल्या मार्गावर नेणारा, आणि नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असणारा नेता म्हणून साकोरे यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.“मुलासारखी काळजी घेतली… आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही!”यात्रेकरू ऋतुजा गोरक्ष साकोरे भावनिक होत म्हणाल्या,“गरजेच्या वेळी अर्ध्या रात्री उभं राहणारा नेता म्हणजे किरण साकोरे. माणुसकी जपणारा असा नेता आपल्याला लाभला, हे आमचं भाग्य आहे.”दुसरे यात्रेकरू चव्हाण म्हणाले,*“यात्रेत कुठेही कमी पडू दिलं नाही. माणूस म्हणून ते मोठे आहेत… देव त्यांचं भलं करणारच. आम्ही आयुष्यभर त्यांना विसरणार नाही.”

यावेळी माजी उपसभापती माऊली वाळके, माजी सरपंच सुनील वागस्कर, रुपेश शिवले, उद्योजक हनुमंत कंद, भाऊसाहेब झुरुंगे, माजी उपसरपंच रामभाऊ काकडे, माजी चेअरमन युवराज काकडे, माजी उपसरपंच दिपाली शिंदे, शिवाजी शिंदे, अमर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सातव यांनी प्रभावीपणे केले तर आभार राहुल कापरे यांनी मानले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पूजा सातव यांनी केले, तर आभार राहुल कापरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!