Rohit Pawar Won Election : भाजपच्या राम शिंदेनी रोहित पवारांना विजयासाठी जोरदार झुंजवलं

स्वराज्य टाईम्स न्यूज

रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी मैदान जिंकल 

बारामतीत शरद पवार कुटुंबातील उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. तर दुसरे उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर झाली.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अवघ्या 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला.परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळे निकालाची घोषणा लांबणीवर पडली. मजमोजणीच्या सुरवातीपासून निकालाची उत्कंठा शिगेला पोचत होती. त्यामुळे दोन्ही उमेदवार मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते.शेवटी रोहित पवार यांचा 1 हजार 243 मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.

कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या आहेत. रोहित पवार यांना 1,27,676 मते मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली आहेत. रोहित पवारांना 1243 मतांची आघाडी मिळाली आहे.ईव्हीएम (Evm)मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बिघाड झालेल्या मशीनच्या स्लीपची मोजणी करण्यात आली दरम्यान, राम शिंदे यांनी फेरमोजणीचा अर्ज दिल्याने रोहित पवार देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. त्यामुळे मतदार केंद्रावर राम शिंदे आणि रोहित पवार आमने-सामने आले होते. शेवटी रोहित पवार यांचा 1 हजार 243 मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.

मतमोजणीच्या सुरवातीलापासून निकालाची उत्सुकता ताणून धरली. राम शिंदे कधी पुढे असायचे, तर रोहित पवार (Rohit Pawar) पुढे असायचे. शेवटला असं वाटत होते की, राम शिंदे विजय खेचून आणतील. कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत रोहित पवार 391 मतांची आघाडी होती. परंतु राम शिंदे यांनी फेर मोजणीचा अर्ज दिला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच ताणली गेली. यानंतर फायनल मतमोजणीनंतर रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 688 मते मिळाली. राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. राम शिंदे यांचा 1 हजार 255 मतांनी पराभव झाला.

याबाबत निवडणूक कमिशनच्या अधिकृत वेब साईट वर निकाल पहावा.

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S13227.htm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!