भीषण अपघात: जुन्नरमध्ये ५० प्रवासी बसची स्टेरिंग मोडली, चालकाची केबिन झाली चक्काचूर..

Swarajyatimesnews

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका खासगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली आहे.या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. भल्या पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा अपघात घडले. यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवासी साखर झोपेत होते. याचवेळी हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर एका खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर बसचा वेग जास्त असल्यामुळे स्टेरिंग मोडून पडली आणि चालकाच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात साखर झोपेत असलेल्या ४० ते ५० प्रवाशांना जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक अडथळ्यात पडली होती.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, बसचालकाने मद्यप्राशन केले होते का आणि अपघाताचे नेमके कारण काय आहे याची तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!