पुणे: जे एस पी एम भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली येथे संगणक विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले नितीन मोहन शिवले यांनी निर्वाण विद्यापीठ जयपूर येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
नितीन शिवले यांनी “ब्लॉक व्हॅलिडीटर हेल्थकेअर सप्लाय चेन मॅनेजमेंट युजिंग ब्लॉक चेन फ्रेमवर्क” या विषयावर सखोल संशोधन केले. हे संशोधन डॉ. प्रतापसिंग पटवल व डॉ. परीक्षित महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. संशोधनाच्या कालावधीत त्यांनी एकूण सहा शोधनिबंध युजीसी केअर आणि स्कोपस सूचीबद्ध जर्नल मध्ये प्रकाशित केले. तसेच दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले. याशिवाय तीन कॉपीराईट भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयात नोंदणीकृत असून एक पेटंट प्रकाशित करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल नितीन शिवले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या मार्गदर्शक प्राध्यापक, कुटुंबीय, सहकारी, तसेच संस्थेचे सचिव डॉ तानाजी सावंत, संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. वाकचौरे, प्राचार्य डॉ. टी के नागराज, विभाग प्रमुख डॉ. गायत्री भंडारी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.