Swarajyatimesnews

बी. जे. एस. महाविद्यालयात “रक्षाबंधन” उत्साहात साजरा!

पुणे: रक्षाबंधनाचा पवित्र सण बी. जे. एस. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. स्थानिकच्या अध्यक्षा रुपाली गुलालकरी आणि सचिव  सहदेव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वच…

Read More
Swarajyatimesnews

‘भारतीय जैन संघटने’च्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा मार्ग

वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी सोपी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आता ‘स्पर्धा परीक्षा केंद्र’ सुरू झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना थेट गावातच उच्च दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  देवा जाधवर: नव्या युगातील स्पर्धा परीक्षांचा मंत्र- उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सरपंच संदीप ढेरंगे यांना दिल्लीतील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याचा मान

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा डोळ्यांनी पाहावा. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या या सुवर्ण क्षणी, हा मान यंदा कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांना सपत्नीक विशेष निमंत्रण मिळाल्याने, केवळ कोरेगाव भीमाच नव्हे, तर…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरच्या भैरवनाथ वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव, सरपंच आणि सदस्यांचा अनोखा उपक्रम!

शिक्रापूर (ता. शिरूर): शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय यंदा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे.  या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि ग्रामपंचायत सदस्य शालन राऊत, उद्योजक प्रीतम राऊत व इतर सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सदस्यत्व दिले आहे, ज्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना…

Read More
Swarajyatimesnews

बी.जे.एस. महाविद्यालयात नागपंचमीनिमित्त ‘सर्प जनजागृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न!

वाघोली (ता.हवेली): नागपंचमीच्या पवित्र आणि पारंपरिक दिवशी, अंधश्रद्धांना छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘सापांविषयी जनजागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, IQAC समन्वयक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, तसेच वनस्पतिशास्त्र…

Read More
Swarajyatimesmews

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More
Swarajyatimesnews

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटले

दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More
Swarajyatimesnews

आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी १ मिनिटात ३२- ३५ वारकऱ्यांना मिळणार विठुरायाचे दर्शन

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!

शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टराची तणावातूनच आत्महत्या…

मानसोपचार तज्ज्ञाच्या मृत्यूने खळबळ.. अकोला: जे डॉक्टर लोकांना तणावातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर झटले, त्याच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी स्वतःच तणावातून बाहेर न पडता विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. त्यांच्या या मृत्यूने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यातील सन्मित्र…

Read More
error: Content is protected !!