Category: स्थानिक वार्ता
अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!
शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८ मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी…
बकोरी परिसरात भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार व संवादास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बकोरी (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लोणीकंद–बकोरी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार पै. किरण संपतराव साकोरे, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी…
जनतेचा विश्वास हीच माझी आशीर्वाद रुपी खरी ताकद -पै.किरण साकोरे
भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी पै. किरण साकोरे मैदानात; पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात विकासाचे रणशिंग फुंकले! लोणीकंद (हवेली): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून पै. किरण संपत साकोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. केवळ उमेदवारी अर्ज नव्हे, तर हा…
धक्कादायक! लोणी काळभोर येथे कार अंगावरून गेल्याने पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू
चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले ! लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ…
बैलगाडा मालकांची जिवलग यारी… लोणीकंद-पेरणे गटात पै. किरण साकोरेंची बसवणार विजयी बारी!
वढु खुर्द येथे ‘विजयी गुलाल’ उधळण्याचा बैलगाडा प्रेमींचा निर्धार वढू खुर्द (ता. हवेली): लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील राजकीय घाटात आता पै. किरण साकोरे यांचीच बारी बसणार आणि आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असा ठाम निर्धार बैलगाडा मालक, शेतकरी आणि युवकांनी व्यक्त केला आहे. वढु खुर्द येथे संपन्न झालेल्या ‘बैलगाडा मालक संवाद मेळाव्यात’ काळया आईच्या लेकरांसाठी आणि…
अनाथपणाचा शिक्का पुसला, सुखाचा संसार मांडला; वढू बुद्रुकच्या ‘माहेर’मध्ये घुमले लग्नाचे मंगलमय सूर!
मारुती भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीतवढू बुद्रुकच्या ‘माहेर’ संस्थेत ३१० व्या जावयाचे स्वागत; बेवारस लेकींचा संसार थाटात झाला साजरा! वढू बुद्रुक (ता. शिरूर) दिनांक १७ जानेवारी : ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर केवळ संकटांचे काटे होते, त्यांच्यावर आज अक्षतांचा वर्षाव झाला. जन्माने अनाथ ठरलेल्या पण कर्माने ‘माहेर’च्या लाडक्या लेकी झालेल्या संगीता आणि काजल यांचा विवाह सोहळा म्हणजे माणुसकीच्या…
अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव
कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…
भारतीय ज्ञान प्रणालीतून ‘गुलामगिरीची मानसिकता’ संपविण्याचे आवाहन – डॉ. शैलेंद्र देवळणकर
भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय शिबिरात ८ राज्यांतील २१५ संशोधकांचा सहभाग वाघोली (ता. हवेली), दि. १० जानेवारी : ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीने भारतीय संस्कृतीला दुय्यम ठरवत भारतीयांच्या मनात न्यूनगंड आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवली. आता काळाची गरज म्हणजे पाठ्यपुस्तकांचे ‘निर्वासहतीकरण’ करून समृद्ध, शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन करणे. हेच भारतीय ज्ञान प्रणालीचे (IKS) खरे उद्दिष्ट असल्याचे परखड…
सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…
वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा
अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…
