धक्कादायक ! लोणी कारभोळ येथे लघुशंका करताना हटकल्याच्या वादातून घरावर दगडफेक व गोळीबार, महिलेचा मृत्यू
पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …