अपंग व्यक्तींना कायम सन्मान मिळाला पाहिजे – लुसी कुरियन
प्रतिनिधी पत्रकार राजाराम गायकवाड शिक्रापूर (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांना केवळ जागतिक अपंग दिनासारख्या एकाच दिवशी मान-सन्मान न मिळता, तो कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले. शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लुसी कुरियन यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, समाजाने दिव्यांग व्यक्तींना…
