वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा
अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…
