
वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत…