कोरेगाव भीमा येथे वादातून रिक्षा चालकाचा खून केलेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय…