
शिक्रापूरमध्ये रेकॉर्डवरील आरोपीचा पोलिसांवर गुप्तीने हल्ला दोन पोलिस जखमी तर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीचा मृत्यू
शिक्रापूर (ता. शिरूर): येथील मलठण फाट्यावर आज (दिनांक ३० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता एक थरारक घटना घडली. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडीचा आरोपी लखन भोसले (वय २५, रा. खटाव, जि. सातारा) याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुप्तीने हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांना हवा असलेला…