शिरुर तालुक्यात जबरी दरोडा; चोरांनी महिलेचे कान कापून सोन्याचे झुबे केले लंपास
शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in…