
कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन
कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…