पोलीस पाटील संघाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधन आणि सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबतच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पोलीस पाटीलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले. हनुमान नगर येथील डॉ. ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या…