
प्रेरणादायी! दगड फोडणाऱ्याचा पोरगा झाला अधिकारी…
चपरासी झाला तरी चालेल या वडिलांच्या शब्दांनी घडवला सरकारी अधिकारी दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात.मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं…