
कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..
शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….