धक्कादायक! प्रियांश अपार्टमेंटमध्ये भीषण स्फोट आणि आग; १९ वर्षीय युवकाचे संतापजनक कृत्य.
पुण्यातील धानोरी (ता.हवेली) परिसरातील ‘प्रियांश अपार्टमेंट’ सोसायटीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट आणि आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय युवकाने सोसायटीतील वाहने पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. १३ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘प्रियांश अपार्टमेंट’च्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज…
